पाण्याचा पैसा पाण्यात
एका खेडेगावात एक दूधवाला रहत असे. त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळविला होता. त्याच्या जवळ बऱ्याच म्हशी होत्या. त्या म्हशीचे दुध काढून ते तो शहरात जाऊन विकत असे. शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे. परंतु शहरातील गिऱ्हाइकपर्यंत पोहचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागे. नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे. बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे. आणि ते दुध तो चांगला नफा मिळवून विकत असे. एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले. मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिऱ्हा इकाकडून पैश्याची वसुली केली. बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैश्यातून त्याने भरजरी कपडे खरेदी केले . तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले. हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला. नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली. सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या. दुधवाला मूकपणे शोक करू लागला. तेवढ्यात नदीतून आवाज आला. " रडू नकोस गिऱ्हा इकांना फसवून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली होतीस तिच वाहून गेली आहे."
तात्पर्य : -
चांगल्या मार्गाने मिळविलेली संपत्ती टिकते. तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही.
No comments:
Post a Comment