Search More Kavita, Katha, Charolya..

तुझ्या - माझ्या प्रेमाच्या चारोळ्या ! (Marathi Charolya)

तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,
म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!

No comments:

Post a Comment