लांडगा आणि ससा
एक लांडगा जंगलात खुप भुकेला होउन हिंडत होता. पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग याला खुप आनंद झाला. लांडगा आपल्याच दिशेने येतो आहे हे पाहून सावध झालेला ससा ढोलीतुन उडी मारून जोरात पळत सुटला. लांडगाही त्याच्या मागे धावू लागला. पण शेवटी ससा जोरजोरात पळत खुप पुढे निघून गेला. लांडगा आधीच भुकेलेला आणि आता पळून पळून थकला होता तो एका झाडाखाली विश्रांती साठी बसला. इतकावेळ ससा आणि लांडग्याची पळापळ झाडावर बसलेला एक कावळा पाहत होता. त्याने खवचटपणे लांडग्याला विचारले, " काय हे , एवढासा ससा तुझ्या हातात सापडला नाही ? असं झाल तर तुझा धाक कसा राहील ?" त्यावर स्वःताची बाजू सावरत लबाड लांडगा म्हणाला," त्याला त्याच्या जीवाची भीती होती म्हणून तो जीवानिशी धावत होता. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला सोडून दिलं. दुसऱ्याच चांगल होण्यासाठी स्वतःचा थोडा तोटा झाला तरी तो सोसायला हवा. "
तात्पर्य :-
साधला तर स्वार्थ नाहीतर परमार्थ .
No comments:
Post a Comment