Search More Kavita, Katha, Charolya..

मराठी म्हणी (Marathi Mahni)

    डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते.
    डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू.
    ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.
    ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.
    ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.
    ढोंग धतोरा, हाती कटोरा.
    ढोरात ढोर, पोरात पोर.
    त वरून ताकभात.
    तण खाई धन.
    तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
    तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
    तळहाताने चंद्र झाकत नाही.
    तळे राखी तो पाणी चाखी.
    तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
    तहान लागल्यावर आड खणणे.
    ताकापुरते रामायण.
    ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
    तागास तूर लागू न देणे.
    ताटाखालचं मांजर.
    ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच.
    तारेवरची कसरत.
    तीन तिघडा काम बिघाडा.
    तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
    तुकाराम बुवांची मेख.
    तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.
    तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
    तुरात दान, महापुण्य.
    तुला नं मला, घाल कुत्र्याला.
    तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
    तेरड्याचे रंग तीन दिवस.
    तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
    तेलणीवर रुसली अंधारात बसली.
    तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
    तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
    तोंडात तीळ भिजत नाही.
    तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
    त्यात काही राम नाही.
    थांबला तो संपला.
    थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
    थेंबे थेंबे तळे साचे.
    थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.
    थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.
    थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.
    दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
    दगडापेक्षा विट मऊ.
    दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
    दहा गेले पाच उरले.
    दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
    दही वाळत घालून भांडण.
    दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
    दांत कोरून पोट भरतो.
    दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
    दानवाच्या घरी रावण देव.
    दाम करी काम.
    दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
    दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
    दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
    दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
    दिवस बुडाला मजूर उडाला.
    दिवसा चुल रात्री मूल.
    दिवाळी दसरा हात पाय पसरा.
    दिव्याखाली नेहमीच अंधार.
    दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
    दुःख रेड्याला न डाग पखालीला.
    दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
    दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे.
    दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
    दुभत्या गाईच्या लाथा गोड.
    दुरून डोंगर साजरे.
    दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
    दुष्काळात तेरावा महिना.
    दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी.
    दृष्टी आड सृष्टी.
    दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
    दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!
    दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.)
    देखल्या देवा दंडवत.
    देण कुसळाच, करणं मुसळाच.
    देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
    देणाऱ्याचे हात हजार.
    देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
    देणे ना घेणे रिकामे गाणे.
    देव तारी त्याला कोण मारी.
    देव भावाचा भुकेला.
    देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला.
    देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
    देवाची करणी आणि नारळात पाणी.
    देश तसा वेश.
    देह देवळात चित्त पायतणात.
    दैव देतं अऩ कर्म नेतं.
    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
    दोघींचा दादला उपाशी.
    दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
    दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
    द्या दान सुटे गिरान (ग्रहण).
    धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.
    धनवंताला दंडवत.
    धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा.(धन्याला कन्या अनं चोराला मलिदा.)
    धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक.
    धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.
    धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.
    धाक ना दरारा, फुटका नगारा.
    धावत्यापाठी यश.
    धावल्याने धन मिळत नाही.
    धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे. (वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.)
    धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा.
    धुतल्या तांदळातला खडा.
    न कर्त्याचा वार शनिवार.
    न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.
    न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
    नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.
    नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
    नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
    नमनाला घडाभर तेल.
    नरो वा कुंजारोवा.
    नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
    नवरा नाही घरी सासरा जांच करी.
    नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.
    नव्याची नवलाई.
    नव्याचे नऊ दिवस.
    नसुन खोळंबा असुन दाटी.
    ना घरचा ना घाटचा.
    नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
    नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
    नांव गंगुबाई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबाई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबाई, रांजनात पाणी नाही).
    नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
    नांव मोठे लक्षण खोटे.
    नांव सगुणी करणी अवगुणी.
    नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
    नांव सोनुबाई अन हाथी कथिलाचा वाळा.
    नाक दाबले की तोंड उघडते.
    नाकपेक्षा मोती जड.
    नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा
    नाकावर पदर अन विशीवर नजर.
    नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
    नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌


No comments:

Post a Comment