दगड
मी तुला कितीदा सांगितले
की हा दगड कठीण आहे
त्याला कोरण्याच अवघड काम
तू करू नकोस.....
पण तू माझ ऐकल नाहीस
आणि कोरतच राहिलीस
आपल स्वप्नशिल्प ......
शेवटी तुझीच छन्नी
तुला लागून जखम झालीय
म्हणून दगडाला दूर लोटून
तू निघून गेलीस .....
तुला वाटत असेल
दगडाने जखम केलीय,
पण तू घातलेले घाव
तो दगड तरी विसरला असेल का ?
No comments:
Post a Comment