अगरबत्ती
तुझी साथ कशी सोडू
जीवनाच्या वळणावर
तुझ्यातल्या वलयाच्या
आधारान झेपावणारे
माझे हात कसे सोडू
एकटीनच जळताना कसा
सहन करतेस प्रवास
आदर्श घ्यावा तुझा
असा असू दे ध्यास
दुसऱ्याच्या सुगंधासाठी
स्वतः चा वनवास
साधारण, सुमार रंग
अंगकाठी तुरीसारखी ढंग
रूपाचा बघतच राहावा बेरंग
जळताना आणते झिंग
आयुष सरत येत तेव्हा
गतकाळाच भान नसत
वर्तमान नसतो विषण्ण
परमेश्वरालाही करतेस प्रसन
तुझ संपण खिन्न खिन्न
मन होत सुन्न
तुझा देह छिन्न
उरतो फक्त सुवास.
No comments:
Post a Comment