तुज्या डोळ्यात
अश्रु नसावे कधी
माझे सर्वस्व हरवून
दुःख पुसावे क्षणी .....
माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का?
सावली सारखी सखे
माझ्या सोबत चालशील का?
डोळ्यांची भाषा
डोळ्यांना समजली...
डोळ्यांनीच मग
ती मनात उतरवली..
डोळ्यांची उघडझाप होताच
लुकाछुपी खेळतोस किती
इतका का रे सतवतोस
मज कळेना तुझी हि प्रीती ..
सतावणे तुझे
डोळ्यांत दिसे
हसून मग..
डोळ्यां लाजवे..!!
तू पाहता क्षणी मजला
काळजाचे ठोके चुकले
लाजेचा पडदा येतामधे
डोळे माझे आपोआप झुकले ..
No comments:
Post a Comment