Search More Kavita, Katha, Charolya..

नियति

नियति

यशोदेच्या स्तनाला
बिलागला कान्हा 
देवकीचा जळे पान्हा

राधेसाठी असा का 
वेडा झाला कृष्ण 
रूक्मिणीला छळे प्रश्न 
राम संगे लक्ष्मण 
भोगे वनवास 
उर्मिलेचा काय दोष ?

कुणाचे हे प्रारब्ध
कुणाच्या ये भाळी
नियतीची कशी खेळी ?
  

No comments:

Post a Comment