कुळकथा गव्हाचे पीक | Wheat Crops Details
जगातील बहुतेक देशांमध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. निसर्गत:च ज्या पिकांमध्ये संकर होतो त्यात गहू आहे. असा संकर होताना जुन्या वाणातले अवगुण सोडून देऊन गुण मात्र कायम ठेवण्याचा गुणधर्म या पिकाने दाखवला आहे.
शवृद्धी आणि वंशसातत्य या दोन प्रक्रिया हाच प्रत्येक सजीवाच्या जगण्याचा मूळ हेतू. त्याचबरोबर सजीवाची प्रत्येक जाती आपलं वेगळंपण टिकवून ठेवण्यासाठी वर्णसंकर टाळतातच. म्हणूनच निसर्गत: संकर फारच क्वचित घडतो. वाघ आणि सिंह दोन्ही एकाच प्रजातीचे. मात्र, निसर्गत: या दोन जातींच्या प्राण्यात संकर घडत नाही. माणसानं नसती उठाठेव केली आणि या दोन प्राण्यांचा संकर घडवून आणला.
यांच्या संकरातून अस्तित्वात आलेला प्राणी. पण, हा प्राणी वंध्य आहे. तो पुढची पिढी तयार करू शकत नाही. 'संकर कुळाच्या नाशास कारणीभूत ठरतो,' असं भगवान श्रीकृष्णांनी 'गीते'त सांगितलं आहे. याचं पालन सर्वच प्राणी आणि वनस्पती करतात. काही वनस्पती तर इतक्या 'सोवळ्या', की स्वत:च्याच जातीच्या दुसर्या फुलातून येणारे पराग त्यांना फलन क्रियेसाठी चालत नाहीत. त्यामुळे आपला वंश त्या शंभर टक्के शुद्ध राखतात. गोकर्ण, वाटाणा या वनस्पतींनी आपला शुद्ध वंश अनेक पिढय़ा टिकवला आहे. याचाच आधार घेऊन ग्रेगर मेंडेलने १८६५मध्ये प्रयोग केले आणि अनुवंशशास्त्राचा पाया घातला. 'केना' ही पावसाळ्यात उगवणारी एक वनस्पती. हिच्या जमिनीवरील फांद्यांवर निळ्या रंगाची, फुलपाखरासारखी दिसणारी फुलं येतात. त्याखेरीज जमिनीखाली पांढर्या रंगाची, न उमलणारी मुग्धपुष्पेही असतात. अर्थात, या फुलांचं फक्त स्वपरागणच शक्य आहे. जात व वंश शुद्ध राखण्याचा एक अजब मार्ग.
'मी जात टाकली' असं गाणं म्हणणार्याही काही वनस्पती आहेत. मात्र, ही 'बंडखोरी' त्यांनी 'बंड करायचं' म्हणून केलेली नाही; तर निसर्गत:च या 'चुका' घडल्या आणि नवीन जाती अस्तित्वात आल्या. निसर्गाच्या या 'चुका' माणसाच्या फारच फायद्याच्या ठरल्या. आज आपण सर्रास वापरत असलेला गहू हे अशा दोन चुकांचं अपत्य आहे. दोन वेळा निसर्गातच आंतरजातीय संकर घडून आजचा गहू जन्मला. त्याने आपल्या पूर्वजांचे 'चांगले', अर्थातच माणसाच्या दृष्टीने गुण स्वीकारले. खरं म्हणजे माणसाला नको असलेले, पूर्वजांचे गुण मोडीत काढले.
गव्हाची पहिली लागवड सुरू झाली, ती भूमध्य समुद्राच्या प्रदेशात. हा गहू फार विचित्र वृत्तीचा म्हणजे तयार झालेले दाणे तुर्यापासून आपोआप विलग होत आणि अक्षरश: विखुरले जात. ते गोळा करणं म्हणजे शिक्षाच. म्हणूनच 'अँडॅम आणि ईव्ह'ला या गव्हापासून Bread म्हणजे पाव तयार करण्याची आज्ञा ईश्वराने दिली असावी. अशा प्रकारचा गहू आजही तुर्कस्तान आणि युगोस्लाव्हियाच्या काही भागात लागवडीखाली आहे.
साधारणत: इ. स. पूर्व आठव्या शतकात या गव्हाचा एका गवताशी 'गोट ग्रास'शी संकर घडून आला. या संकरित गव्हात आपोआप विखुरण्याचा गुणधर्म नव्हता, हे बरं झालं. मूळ गव्हात आणखी एक वैगुण्य होतं. आंबवून पाव तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी गहू भाजावा लागे. मग तो कांडत आणि पीठ तयार करत. या क्रियेत विशेषत: भाजण्यामुळे गव्हातील प्रथिने एकत्र गोळा होत आणि आंबण्याच्या क्रियेत तयार होणार्या कार्बनडायऑक्साईडचे बाहेर पडण्याचे रस्ते बंद होत. परिणामी, हा पाव फुगत नसे. आजही हा भूमध्य प्रदेश, मध्य रशिया, फार काय भारतातही काही भागांत लागवडीखाली आहे. याचे दाणे जड असतात आणि ही जात ं१्रं'>ं१ ि६ँीं३ /ं१्रं'>किंवा ं१्रं'>टूं१ल्ल्र ६ँीं३ /ं१्रं'>म्हणून ओळखली जाते. आपण याला 'खपली गहू' म्हणतो. रवा, शेवया, नूडल्स करण्यासाठी हा गहू वापरला जातो.
यानंतर 'खपली' गव्हानं पुन्हा नवा 'घरोबा' केला. आणखी एक संकर. यातून आपण आज वापरत असलेला ं१्रं'>रा३ ६ँीं३ /ं१्रं'>अस्तित्वात आला. याचं पीठ करण्यासाठी त्याला भाजावं लागत नाही. त्यामुळे याच्या पिठातील ग्लायडिन आणि ग्लुटेनिन ही दोन प्रथिनं भिजवलेल्या कणकेतील ताणाला जबाबदार राहतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत या प्रथिनांतून कार्बनडायऑक्साईड सहज बाहेर पडू शकतो आणि पाव फुगून टम्म होतो.
गव्हातले हे बदल त्याची जातिव्यवस्था बदलण्यामुळे झाले. हे सर्व बदल नैसर्गिकरीत्या झाले. चाणाक्ष माणसाने ते शोधले आणि स्वत:साठी त्याचा वापर केला.
No comments:
Post a Comment