मराठी विनोद
असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?
वास्को -द- गामा!
नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!
मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."
"माहीत नाहीत सर."
दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!
आपल्या पुस्तकातील एका कवितेचे पान पुढे धरीत कविवर्य नारायण सुर्व्यांच्या चिरंजीवानी, रवींद्र सुर्वेने मागणी केली, "हे पहा, तुमच्या कविता आम्हाला अभ्यासाव्या लागतात. तुम्हीच ही कविता शिकवा मला,"
"नको, बुवा, या कवितेचा अर्थ तू आपल्या शिक्षकांनाच विचार," नारायण सुर्वे म्हणाले. "पण ही कविता तुम्ही शिकविली तर’
‘अरे, ही कविता मी शिकविली तर अर्थ चुकेल आणि शून्य मार्क मिळतील तुला," नारायण सुर्वे त्याला समाजावित म्हणाले!
राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.
No comments:
Post a Comment