Search More Kavita, Katha, Charolya..

संगतीचा परिणाम (Marathi Bodh Katha)

संगतीचा परिणाम  



एका गावाबाहेर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्या झाडाला खूप चिंचा लागत असत. त्या झाडाची सावली वाटसरुंना गारवा देत असे. ते झाड इतके विचारी होते की आपल्या पिकलेल्या चिंचा ते स्वत: होवून खाली पाडून टाकत असे. वाटसरू अशा चिंचा घेवून जात. त्यातील कांही चिंचोके कुठे ना कुठे, कधी ना कधी रुजत असत, उगवत असत आणि त्यातील कांहीचे मोठे झाडही होत असे. जिनेटिक गुणांमुळे या नवीन उगवणा-या झाडांचा माइंडसेटही त्या गावाबाहेरच्या चिंचेच्या झाडासारखाच परोपकारी, सात्विक, पॉसिटिव्ह थिंकिंग करणारा असे.

पण संगतीच्या परिणामामुळे एखाद्याचे चांगले मूळ गुण कसे मार खातात त्याची ही कथा आहे.

एके दिवशी एका कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले.  त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.'

'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'.

हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'.

चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे.

एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले.

आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'.

आता मात्र चिंचेचे  झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले,  आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच  लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले. मेले.

आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले.

अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....

अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास ..... 


तुकुतुकू ग्रहावरून आलेल्या त्या एलियनने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचे ठरवले होते. त्याने आता पुण्याकडे आपला मोर्चा वळवला. एका अमेरिकन इतिहास संशोधकाच्या रुपात तो पुण्यात अवतरला. इतिहासाची आवड असणा-या कांही टिपिकल पुणेरी लोकांशी त्याने मैत्री केली. त्याने मित्र निवडताना ज्यांच्या चेह-यावर प्रचंड तुच्छताभाव दिसत होता असेच नमुने निवडले. असे करण्याचे कारण म्हणजे त्याच्या तुकुतुकू ग्रहावर या प्रकारचे स्वत:ला फारच शहाणे समजणारे लोक होते, त्यांच्याशी यांचे काय साधर्म्य आहे हे त्या एलीयनला बघायचे होते. अर्थातच असे मित्र गोळा करायला त्याला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.

एके दिवशी त्याचा एक पुणेरी मित्र आपली नसलेली छाती फुगवत त्याला म्हणाला, "तुमच्या अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास आहे, पण आमच्या भारताला 5000 वर्षांचा इतिहास आहे". हे ऐकताच तो एलियन म्हणाला, "हो, आणि तुमच्या महाराष्ट्राला तर फक्त साडे तीनशे वर्षांचाच इतिहास आहे".

एलियनचे हे मत ऐकल्यावर त्या पुणेकराची छाती एकदम आतच गेली. मग तो एलियन म्हणाला, 'अरे मित्रा, तुला तुझ्या महाराष्ट्राचा 350 वर्षापूर्वीचा इतिहास माहीत नाही, मग अमेरिकेचा 500 वर्षांपूर्वीचा इतिहास कसा काय माहीत असणार? तुझे अज्ञान मी समजू शकतो. अरे, तू जेंव्हा अमेरिकेला 500 वर्षांचाच इतिहास आहे असे म्हणतोस, त्यावेळी तुला युरोपिअन लोक अमेरिकेत गेले आणि तेथे वसले एवढेच माहीत असते. पण त्या अगोदरही तेथे लोक होते आणि त्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे हे तू विसरतोस. तुझ्यासारख्या बुद्धिमान टोळीचा वारसा असलेल्या माणसाला हे अज्ञान शोभत नाही".

हे ऐकताच तो पुणेकर तरातरा निघून गेला. पुढे तो एका इतिहास विध्वंसक मंडळात त्या एलियनला दिसला होता. एका कर्नाटकी माणसाला म्हणत होता, "आमच्या महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल या दोन्ही गोष्टी आहेत, तुमच्या कर्नाटकाला फक्त भूगोलच आहे".

एलियनची आता पक्की खात्री झाली की हे टिपिकल पुणेकर कधीच सुधरू शकत नाहीत. तुकुतुकू ग्रहावरील त्या रानटी गो-या टोळ्यांशी यांचे फारच साम्य आहे हे त्याला आता कळून चुकले होते.

पाणी गढूळ करणारा कोळी - Marathi Bodh katha


पाणी गढूळ करणारा कोळी - Marathi Bodh katha



एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.

त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'

तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.

मराठी विनोद

मराठी विनोद


असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?
वास्को -द- गामा!

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’



शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!




एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!


मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."
"माहीत नाहीत सर."
दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!


आपल्या पुस्तकातील एका कवितेचे पान पुढे धरीत कविवर्य नारायण सुर्व्यांच्या चिरंजीवानी, रवींद्र सुर्वेने मागणी केली, "हे पहा, तुमच्या कविता आम्हाला अभ्यासाव्या लागतात. तुम्हीच ही कविता शिकवा मला,"
"नको, बुवा, या कवितेचा अर्थ तू आपल्या शिक्षकांनाच विचार," नारायण सुर्वे म्हणाले. "पण ही कविता तुम्ही शिकविली तर’
‘अरे, ही कविता मी शिकविली तर अर्थ चुकेल आणि शून्य मार्क मिळतील तुला," नारायण सुर्वे त्याला समाजावित म्हणाले!



राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.

कुळकथा गव्हाचे पीक

कुळकथा गव्हाचे पीक | Wheat Crops Details


जगातील बहुतेक देशांमध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. निसर्गत:च ज्या पिकांमध्ये संकर होतो त्यात गहू आहे. असा संकर होताना जुन्या वाणातले अवगुण सोडून देऊन गुण मात्र कायम ठेवण्याचा गुणधर्म या पिकाने दाखवला आहे. 
शवृद्धी आणि वंशसातत्य या दोन प्रक्रिया हाच प्रत्येक सजीवाच्या जगण्याचा मूळ हेतू. त्याचबरोबर सजीवाची प्रत्येक जाती आपलं वेगळंपण टिकवून ठेवण्यासाठी वर्णसंकर टाळतातच. म्हणूनच निसर्गत: संकर फारच क्वचित घडतो. वाघ आणि सिंह दोन्ही एकाच प्रजातीचे. मात्र, निसर्गत: या दोन जातींच्या प्राण्यात संकर घडत नाही. माणसानं नसती उठाठेव केली आणि या दोन प्राण्यांचा संकर घडवून आणला.


यांच्या संकरातून अस्तित्वात आलेला प्राणी. पण, हा प्राणी वंध्य आहे. तो पुढची पिढी तयार करू शकत नाही. 'संकर कुळाच्या नाशास कारणीभूत ठरतो,' असं भगवान श्रीकृष्णांनी 'गीते'त सांगितलं आहे. याचं पालन सर्वच प्राणी आणि वनस्पती करतात. काही वनस्पती तर इतक्या 'सोवळ्या', की स्वत:च्याच जातीच्या दुसर्‍या फुलातून येणारे पराग त्यांना फलन क्रियेसाठी चालत नाहीत. त्यामुळे आपला वंश त्या शंभर टक्के शुद्ध राखतात. गोकर्ण, वाटाणा या वनस्पतींनी आपला शुद्ध वंश अनेक पिढय़ा टिकवला आहे. याचाच आधार घेऊन ग्रेगर मेंडेलने १८६५मध्ये प्रयोग केले आणि अनुवंशशास्त्राचा पाया घातला. 'केना' ही पावसाळ्यात उगवणारी एक वनस्पती. हिच्या जमिनीवरील फांद्यांवर निळ्या रंगाची, फुलपाखरासारखी दिसणारी फुलं येतात. त्याखेरीज जमिनीखाली पांढर्‍या रंगाची, न उमलणारी मुग्धपुष्पेही असतात. अर्थात, या फुलांचं फक्त स्वपरागणच शक्य आहे. जात व वंश शुद्ध राखण्याचा एक अजब मार्ग. 
'मी जात टाकली' असं गाणं म्हणणार्‍याही काही वनस्पती आहेत. मात्र, ही 'बंडखोरी' त्यांनी 'बंड करायचं' म्हणून केलेली नाही; तर निसर्गत:च या 'चुका' घडल्या आणि नवीन जाती अस्तित्वात आल्या. निसर्गाच्या या 'चुका' माणसाच्या फारच फायद्याच्या ठरल्या. आज आपण सर्रास वापरत असलेला गहू हे अशा दोन चुकांचं अपत्य आहे. दोन वेळा निसर्गातच आंतरजातीय संकर घडून आजचा गहू जन्मला. त्याने आपल्या पूर्वजांचे 'चांगले', अर्थातच माणसाच्या दृष्टीने गुण स्वीकारले. खरं म्हणजे माणसाला नको असलेले, पूर्वजांचे गुण मोडीत काढले.
गव्हाची पहिली लागवड सुरू झाली, ती भूमध्य समुद्राच्या प्रदेशात. हा गहू फार विचित्र वृत्तीचा म्हणजे तयार झालेले दाणे तुर्‍यापासून आपोआप विलग होत आणि अक्षरश: विखुरले जात. ते गोळा करणं म्हणजे शिक्षाच. म्हणूनच 'अँडॅम आणि ईव्ह'ला या गव्हापासून Bread म्हणजे पाव तयार करण्याची आज्ञा ईश्‍वराने दिली असावी. अशा प्रकारचा गहू आजही तुर्कस्तान आणि युगोस्लाव्हियाच्या काही भागात लागवडीखाली आहे.
साधारणत: इ. स. पूर्व आठव्या शतकात या गव्हाचा एका गवताशी 'गोट ग्रास'शी संकर घडून आला. या संकरित गव्हात आपोआप विखुरण्याचा गुणधर्म नव्हता, हे बरं झालं. मूळ गव्हात आणखी एक वैगुण्य होतं. आंबवून पाव तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी गहू भाजावा लागे. मग तो कांडत आणि पीठ तयार करत. या क्रियेत विशेषत: भाजण्यामुळे गव्हातील प्रथिने एकत्र गोळा होत आणि आंबण्याच्या क्रियेत तयार होणार्‍या कार्बनडायऑक्साईडचे बाहेर पडण्याचे रस्ते बंद होत. परिणामी, हा पाव फुगत नसे. आजही हा भूमध्य प्रदेश, मध्य रशिया, फार काय भारतातही काही भागांत लागवडीखाली आहे. याचे दाणे जड असतात आणि ही जात ं१्रं'>ं१ ि६ँीं३ /ं१्रं'>किंवा ं१्रं'>टूं१ल्ल्र ६ँीं३ /ं१्रं'>म्हणून ओळखली जाते. आपण याला 'खपली गहू' म्हणतो. रवा, शेवया, नूडल्स करण्यासाठी हा गहू वापरला जातो.
यानंतर 'खपली' गव्हानं पुन्हा नवा 'घरोबा' केला. आणखी एक संकर. यातून आपण आज वापरत असलेला ं१्रं'>रा३ ६ँीं३ /ं१्रं'>अस्तित्वात आला. याचं पीठ करण्यासाठी त्याला भाजावं लागत नाही. त्यामुळे याच्या पिठातील ग्लायडिन आणि ग्लुटेनिन ही दोन प्रथिनं भिजवलेल्या कणकेतील ताणाला जबाबदार राहतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत या प्रथिनांतून कार्बनडायऑक्साईड सहज बाहेर पडू शकतो आणि पाव फुगून टम्म होतो.
गव्हातले हे बदल त्याची जातिव्यवस्था बदलण्यामुळे झाले. हे सर्व बदल नैसर्गिकरीत्या झाले. चाणाक्ष माणसाने ते शोधले आणि स्वत:साठी त्याचा वापर केला.