गांधी टोपी
फिरुनि आज उजळेल गांधी
अण्णाच्या आंदोलनातुनी
देशभर भरली टोपी गांधी
गांधी टोपीवरती बसले अण्णा
म्हणती भ्रष्टाचार चौफेरुनी हाणा
एवढीच आहे आता एकच नामी संधी
गेले गांधी उलटली वर्षे साठ
भ्रष्टाचारी भस्मासुर झाला ताठ
अण्णा म्हणती, तयासी ठेचणार कधी
कायदा आला, त्याला धाब्यावर बसविला
धाब्यावर बसतो तो कायदा कसला
आपणच व्हा सुसंस्कारित, सांगे टोपी गांधी
No comments:
Post a Comment