Search More Kavita, Katha, Charolya..

Navin Vidhnyan Vishw 2013

Navin Vidhnyan Vishw 2013 | Vidhnyna Katha 2013 



लग्नातली देणी-घेणी ( मराठी बोधकथा (Marathi Moral Stories),

 लग्नातली देणी-घेणी
उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.

एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'

प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'

ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?

यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'

प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'

राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'

राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.

संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'

त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'

यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'

राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'

गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'

वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.

माझ्या भावना ( चारोळ्या ) ( मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

वादळाला नसते
विध्वंसाची चिंतां
म्हणूनच तर ते वाढवते
झाडाच्या आयुष्यातील गुंतां

जमिनीवरती आहोत म्हणून
आभाळ आपल म्हणायचं
डोक्यावरती असते म्हणून
त्यानेच जपल म्हणायचं

नकोत नुसत्या आठवणी
रडत बसण्यासाठी
असेही काहीतरी आठवावे
खुदकन हसण्यासाठी

त्या मातीची जात कोणती
जिथे रुजवलीस तुझी मुळे
उंच वाढल्या त्या वृक्षावर
आभाळ वाकते तुझ्या मुळे

ज्योतिषी (मराठी विनोद (Marathi Jokes)),

ज्योतिषी (बंड्याला) : लग्नानंतर तुझ्या आयुष्यात १२ मुली येतील..
बंड्या (आनंदातिरेकाने) : wow!!!... लग्नानंतरही आयुष्यात मुली येतील...येस्स!! !!... लाइफ हो तो ऐसा !!!! ....
.
.
.
.
ज्योतिषी : जास्त खुश होऊ नकोस. त्यापैकी १ तुझी बायको असेल आणि बाकी ११ तुझ्या मुली......

विद्यार्थी परीक्षेला : (मराठी विनोद (Marathi Jokes),)

परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न :

मुंग्यांना कसे माराल ?

उत्तर:
... पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर...

जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..

तात्पर्य : १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील.

कोल्हा, रानमांजर आणि ससा (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories)),



कोल्हा, रानमांजर आणि ससा
 एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.'

    तात्पर्य :- एकमेकांशी शत्रुत्व करणाऱ्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.

गाढव आणि त्याचा निर्दय धनी (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))


गाढव आणि त्याचा निर्दय धनी 
एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे.
 अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले.
हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला.
 त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे.
तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

 तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.

काळ्या !( मराठी विनोद (Marathi Jokes))


छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"
काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"
दुकानदार -"
हो आहे ना..."
मुलगी - "
मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!"

मराठी विनोद (Marathi Jokes),


दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात.. एक मित्र मरत असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो ...तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.. काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्याच्या स्वप्नात... ... ... आला आणि म्हणाला ...एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट ...कोणती आधी सांगू...?? दुसरा मित्र म्हणाला चांगली ... आधी मेलेला मित्र म्हणाला ..आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे... वाईट बातमी म्हणजे ...बुधवारच्या म्याच मध्ये तुला बोलिंग करायची आहे..

Funny Marathi Ukhane Makarsankranti Special

बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
*****राव बिड्या पितात संडासात बसून


आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!

 

Funny Marathi Ukhane for Makarsnakranti (मराठी उखाणे(Marathi Ukhane)


MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!
............................................................
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
..............................................................
***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
............................................................
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे (Makar sankranti Ukhane)

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे
रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
   ----------  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन

   नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
   --------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी

   पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
   ---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

   सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
    ---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

    हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
    ------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी
    शिंपल्यात सापडले माणिक मोती
    ------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी
    महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
    ------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
    आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
    ----- रावांना घास देते गोड जिलेबीचा
    मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
    ----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स
    आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
    ----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी
    सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
    ----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी
    सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
    ----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
    सासरचे निराजंन माहेरची फुलवात
    ----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
    जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
    ----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
    माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
    त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर
    आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
    ----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
    पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
    ----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
    सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
    यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार
     मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
     ----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
     पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
     ----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात