Search More Kavita, Katha, Charolya..

व्हॅलेंटाईन गॉड कविता (मराठी कविता (Marathi Kavita))

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन ॥ ध्रू ॥
घेती तुझे नाम आज १४-फे
पाठविती एकमेका किती लिफाफे
लिफाफ्यात त्या पत्रिका 'बदामी'
'तूच माझी' अशी प्रत्येकीस हमी!

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन......
आला, आला, आला तो सुदिन

आजच्या दिनी खरेदी प्रचंड
आई-बापांना नसता भूर्दंड
विसरले सारे या देशीचे संत
तू परदेशी पण तूच पसंत

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन...!

नकळत कहितरि घडावे...........! (मराठी कविता (Marathi Kavita))

हुल्लड बालपन खेळातच रमाव
परिस॑गे जादुच्या दुनियेत शिराव
सदा मनि एकच विचार.....वाटते....
अदभुत कहितरि घडाव नकळ्त आज.

अभ्यासाचा बोजा तोच अवघड ग्रुह्पाठ
रोज रोज लिहुनि थकावे मग दुखते पाठ
कसि सुटि मिळेल शाळेला हा एकच विचार
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

मग तारुन्यपन येत मिसरुड फुट्त ओठावर
वहि बोटावरुन फिरवताना मुलिकडे बघाव रोज
तिच्या होकारासाठि सतत ठरलेला पाठलाग
नैतिकतेचे भाषण देउन प्राध्यापक मग थकतात
सार कहि निरथक चा॑गल राहत बाजुला
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मला.

पदविधर होताच हि॑डावे नोकरिसाठि दाहिदिशा
सततचा नकार एकुनि जिव होइ वेडापिसा
काय शिकलो? किति शिकलो? याच गणित तेव्हा कराव
वेळेच महत्त्व किति असत याच भान तेव्हा उमजुन याव
अन चाहुल लागावि मनि दुखि होउनि
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मनि.

दिवसामागुन दिवस जातात वय उलटु लागत
जबाबदारिच ओझ जड होतच राहत
नकळ्त पानावतात डोळे तिचा चेहरा उभा राह्तो
कुठे असेल ति मन भुतकाळात डोकाउ लागत
एक अत्रुप्त इछ्या तिच्या सोबत जगन्याचि
गुदमरुन टाकते या जातिच्या पगड्यात
क्षणात ह्रुदय पिळवटुन निघत...
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

बापाच नात मग जपाव लागत
त्या हळ्व्या क्षणा॑नि मन चिम्भ भिजुन जात
आपल बालपन आठ्वु लागत आपल्या मुलात तेव्हा
असेच होतो ना आपण हट्टि त्या वेळेला
सार कस उन्म्ळुन येत एकापाठोपठ एक
अन वाट्ते नकळत कहितरि घडावे आज.

मग अ॑ग थकत सार काहि थकत क्षिण होउन जात शरिर
नजरेसमोर दिसु लागत म्रुत्युच भयान प्रतिबिम्ब
हाति येते काठि तोच एकमेव आधार
सार काहि सुन सुन मावळत जाणारि स॑न्द्याकाळ
उशाकाल होइल का?.....चक्र असे हे नशिबाचे
तरिहि या स॑पलेल्या वळ्णावर कुठेतरि उगाचच का वाट्ते
नकळत कहितरि घडावे...........!
नकळत कहितरि घडावे ..........!

मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

संपला उचला लवकरी!
लक्ष होतं त्याचे मजवरी !!
एकदा आली पाळी मजघरी!
म्हणती उचल रे झडकरी !!


मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

पाहत होतो प्रेमाचा रंग 
त्यात झाली होती रे दंग !!
निघाला वीर विवेकानंद !
बघुनी बाय पडली थंड ! 

गुलाब पुष्प (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories)),

गुलाब पुष्प 
एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला. त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, " दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील." हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, "जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल." या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली.  " हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला, " महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं." राजा त्याच्या होशारीवर खुश झाला.

तात्पर्य : -   सारासार विचार करून निर्णय घेतल्यास तो योग्य ठरतो.


उद्योगी माकड ( मराठी बोधकथा (Marathi Moral Stories)),

  उद्योगी माकड 
 एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरविले. मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरवात केली. तेथे लाकडाचे सुद्धा काम सुरु झाले. त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत. मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे. त्यातील काही माकडे फार उद्योगी होती.  ती रोज सुताराना काम करताना पाहात असत. एक दिवस दुपारच्या वेळेस ते सर्व सुतार जेवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला जवळच्या नदी काठावर गेले. सुतार तिथे झोपले आहेत असे पाहून सर्व माकडे झाडावरून खाली उतरली. त्यातील काही माकडे जिथे काम करत होती तेथे गेली; आणि सुतारांची हत्यार उस्तरू लागली. एक भले मोठे झाडाचे खोड तिथे पडले होते. सुतारांनी ते अर्धे कापून ठेवले होते. जेवण झाल्यावर ते पूर्ण कापायचे म्हणून त्या अर्ध्या कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा घालून ठेवला होता.  एका माकडाने ते पाहिले. ते त्या खोडावर जाऊन बसले; आणि सुताराप्रमाणे ते पाचर काढू लागले. एका वृद्ध माकडाने तसे करू नको म्हणून सुचविले. परंतु त्या माकडाने पाचर ओढून काढली. त्याबरोबर लाकडाची ती फट बंद झाली. त्यात त्या माकडाची शेपटी अडकली. शेपटीला दुखापत झाल्यामुळे ते ओरडू लागले.

तात्पर्य : - 
                 वेडपट उद्योगाची किंमत माकडाला मोजावी लागली.


 

मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

पूर्वीचा गणेशोत्सव
होई मोठे प्रबोधन
रोषणाई झगमगाट
आता फक्त खर्च धन !!

मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

भ्रष्टाचार, महागाई 
समस्यांचे पर्यावरण 
श्री गणेशाचे आगमन 
संकटाचे निवारण!!


भाव वाढीचा भासे 
परिणाम मोठा
 नैवेद्याच्या ताटात 
मोदक असे छोटा !!


 


गांधी टोपी (मराठी कविता (Marathi Kavita)),

गांधी टोपी 
 फिरुनि आज उजळेल गांधी
अण्णाच्या आंदोलनातुनी 
 देशभर भरली टोपी गांधी

  गांधी  टोपीवरती बसले अण्णा
म्हणती भ्रष्टाचार चौफेरुनी हाणा
एवढीच आहे आता एकच नामी संधी

 गेले गांधी  उलटली वर्षे साठ
भ्रष्टाचारी भस्मासुर झाला ताठ
 अण्णा म्हणती, तयासी ठेचणार कधी 

कायदा आला, त्याला धाब्यावर बसविला 
 धाब्यावर बसतो तो कायदा कसला 
 आपणच व्हा सुसंस्कारित, सांगे टोपी गांधी




मराठी सुविचार (Marathi Thoughts),

    १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
    २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
    ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
    ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
    ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
    ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
    ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
    ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
    ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
    १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
    ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
    १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
    १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
    १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
    १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
    १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
    १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
    १८) आधी विचार करा; मग कृती करा.
    १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
    २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
    २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
    २२) अतिथी देवो भव ॥
    २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
    २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
    २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी ! ( मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

 गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी


पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''

         अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ  गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही. सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत पाणी आले.

         मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण निर्माण होऊ दे.'

पाणी गढूळ करणारा कोळी (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

   पाणी  गढूळ करणारा कोळी.

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.

त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'

मराठी म्हणी (Marathi Mahni),

अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.

अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.

अपयश हे मरणाहून वोखटे.

अपापाचा माल गपापा.

अपुऱ्या घड्याला डबडब फार.

अप्पा मारी गप्पा.

अर्धा वैद्या मरणास खाद्य.

अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.

अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

अल्प बुध्दी, बहु गर्वी.

अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.

अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.

अळी मिळी गुपचिळी.

अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.

अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.

असतील चाळ तर फिटतील काळ.

असतील मुली तर पेटतील चुली.

असतील शिते तर जमतील भूते.

असून अडचण नसून खोळांबा.

असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.

असेल दाम तर हो‌ईल काम.

असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

मराठी सुविचार (Marathi Thoughts)

    सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  
   "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.
  
    आधी विचार करा, मग कृती करा.
  
    स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

    कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते

    आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

    शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

    निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

    ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर

    जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो

    मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

    आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

    एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

    तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

    सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

    सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

मराठी म्हणी (Marathi Mahni)

म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या संग्रही नाही. आपल्याला जर अश्या प्रकारच्या म्हणी माहीतअसतील तर आम्हाला जरूर कळवा.
याची देहा, याची डोळा.
याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
रंग गोरापान आणि घरात गु घान.
रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
राईचा पर्वत.
राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
राजा तशी प्रजा.
राजा बोले अऩ दल चाले.
राजाला दिवाळी काय ठाऊक?
रात्र थोडी अऩ सोंग फार.
रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
रोज मरे त्याला कोण रडे.
लंकेत सोन्याच्या विटा.
लकडी शिवाय मकडी वळत नाही.
लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
लहान तोंडी मोठा घास.
लांड्यामागे पुंडा.
लाखाचे बारा हजार.
लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
लेकी बोले सुने लागे.
लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
वड्याचे तेल वांग्यावर.
वर झगझग आत भगभग.
वर मुकुट आणि खाली नागडं.
वराती मागून घोडे.
वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
वरून कीर्तन आतून तमाशा.
वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
वळवाचा पाऊस.
वळू ऊठला पण संशय फिटला.
वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
वाचेल तो वाचेल.
वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
वाटाण्याच्या अक्षता.
वासरात लंगडी गाय शहाणी.
वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
विषाची परीक्षा.
विहीणाचा पापड वाकडा.
वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.


मराठी विनोद (Marathi Jokes)

गंपू घरी बायकोचा फोटो समोर ठेवून त्याच्यावर चाकू मारत असतो. पण प्रत्येक वेळी त्याचा नेम चुकत असतो. तेवढ्यात बायकोचा फोन येतो. ती विचारते, 'काय क

रतोयस?' गंपू उत्तरतो, 'तुला मिस् करतोय!'

मराठी विनोद (Marathi Jokes)

संता आणि त्याची बायको आफ्रिकेच्या जंगलात फिरत होते. तितक्यात एक बिबळ्या त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला.

संताची बायको : ओ जी...वाघ आपल्या समोर आहे. लवकर शूट करा.

संता : अगं थांब जरा दोन मिनिटं...कॅमेऱ्याची बॅटरी बदलतो आणि मग शूट करतो.

गरुड आणि घुबड (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

 गरुड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, `गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, `खरेच, तुझी पिल्लें कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, `ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, शब्द सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'

पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ` किती घाणेरडी , कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, `गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, `मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'

    तात्पर्य:-
                                  स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटांत पाडून घेतो.

मराठी विनोद (Marathi Jokes)


पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?

गंपू : हो!

मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!

मराठी विनोद (Marathi Jokes)

पाहुणे : अरे वा, तुमच्याकडे पुस्तकांचं चांगलं कलेक्शन आहे! आता त्याच्यासाठी एक चांगलंसं कपाट पण घ्या!


यजमान : अहो कपाट कोणी उसनं देत नाही!

मराठी विनोद (Marathi Jokes)


वेटर : तुम्ही हॉटेलचे दोन चमचे खिशात टाकलेत!


गिऱ्हाइक : मला डॉक्टरांनीच सांगितलंय- जेवल्यावर दोन चमचे घेत जा!!

मराठी विनोद (Marathi Jokes)

शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं!


खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो.


शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का?


गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं!!

मराठी विनोद (Marathi Jokes)

शिक्षक : हाजीअली कुठे आहे?


गंपू : वरळीला!


शिक्षक : प्रभादेवी कुठे आहे?


गंपू : कालच साताऱ्याला गेली!